twitterfacebookemail

Thursday, 21 May 2015

Invitation

Anandwan Mitra Mandal, Navi Mumbai



Anandwan Mitra Mandal, Navi Mumbai 
coordially invites you for the following programme 

विनम्र आवाहन 
सर्व प्रिय आप्तेष्ट व मित्र मंडळी यांस स.न.वि.वि.

शुभकार्याच्या निमित्ताने आप्तेष्टांना भेटवस्तू देणे ही आपल्या सर्वांच्याच दृष्टीने आनंदाची गोष्ट ! पण मंडळी या शुभकार्याच्या निमित्ताने आम्ही काही वेगळं करायचं मनात योजलं आहे. आम्ही कोणत्याही स्वरुपात आहेर किंवा भेटवस्तू घ्यायच्या नाहीत असे ठरविले आहे. त्या ऐवजी आम्ही स्वतः श्रमर्शि बाबा आमटे यांच्या आनंदवन संस्थेस सदिच्छा म्हणून काही रक्कम देण्याचे ठरविले आहे.
आपली इच्छा असेल तर आपणही आमच्याबरोबर या उपक्रमात सहभागी होऊ शकता, अर्थात आमचा हा विचार आपल्याला आवडला,
पटला तर आणि तरच ! आपल्याला कोणत्याही प्रकारचा आग्रह व सक्ती आजीबात नाही.
एकमेकांना भेटवस्तू देण्याऐवजी आपण सारे मिळून योग्य ठिकाणी, योग्य व्यक्तींसाठी मदतीचा हाथ पुढे करूया !
रविवार दि.२४ मे २०१५ रोजी म्हणजेच स्वागत समारंभाच्या दिवशी, आनंदवन संस्थेचे प्रतिनिधी जातीने हजर राहणार आहेत. आपली इच्छा असल्यास त्यानुसार आपण आपली देणगी त्यांच्याकडे सुपूर्द करावी. देणगीची पावती आपल्याला ताबडतोब देण्यात येईल.
आपल्या भरगोस प्रतिसादानं आमचा हा वेगळा उपक्रम नक्कीच यशस्वी होईल याची आम्हाला पूर्ण खात्री आहे.

0 comments:

Post a Comment