twitterfacebookemail

Monday, 18 May 2015

सोमनाथच्या श्रमविद्यापिठात तरुणाई गिरविणार श्रमाचे धडे..

मूल- श्रमर्षी बाबा आमटे

यांनी स्थापन केलेल्या सोमनाथ प्रकल्प ( ता. मूल जि. चंद्रपूर ) येथे शुक्रवार दिनांक 15 मे पासून तरुणाईच्या सळसळत्या उत्साहात श्रमसंस्कार छावणीला सुरुवात झाली असून श्रमसंस्कार छावणीचे हे सलग 48 वे वर्ष आहे. त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र आणि ईतर राज्यातून सहाशेच्यावर युवकयुवती शिबिर स्थळी पोहचले आहेत.महारोगी सेवा समितीच्या वतीने स्थापन झालेल्या आनंदवन मधील कृष्ठरुग्णांनीबाबा आमटेंच्या प्रेरणेतून सोमनाथ प्रकल्प उभा केला आहे. 1967 साली देशभरातील युवकांना एकत्रित करुन याच प्रकल्पात श्रमसंस्कार छावणी सुरु करण्यात आली. तेव्हापासून आजपर्यंत या श्रमसंस्कार छावणीत सहभागी होण्यासाठी युवक युवती वर्षभर मे महिण्याची वाट पाहतातदरवर्षी दि. 15 मे ते 22 मे दरम्यान हे शिबिर पार पडते.


0 comments:

Post a Comment